MP Supriya Sule meets The collector of lakhevadi village taluka indapur 
पुणे

गोर गरीबांना वाऱ्यावर सोडणार नाही : खासदार सुप्रिया सुळे

सकाळवृत्तसेवा

वडापुरी : लाखेवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतील 250 कुटुंबियांना घरकुल मंजूर होऊन गेली 30 वर्षे कालावधी झाला व आता गरीब कुटुंबातील नागरीक घरकुलामध्ये राहत आहेत. परंतु सदर जागा वनखात्याची असल्याने आता या लोकांना शासनाकडून नोटीस जात आहे. अतिशय गरीब परिस्थितीतील ही कुटुंबे असल्याने यावर तोडगा काढावा, अशी मागणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासोबत विषेश बैठक घेतली. यावेळी पुणे जिल्हा परीषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इंदापूर तालुक्यांतील विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केल्या आहेत. 

या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्या लोकसभा मतदार संघातील लाखेवाडी हे गाव असून, उपेक्षित व गरीब कुटुंबातील नागरीक या ठिकाणी घरकुल योजनेतून उभारलेल्या घरात राहतात. एकीकडे पाऊस नाही, शासनाची धोरणे सामान्य जनतेला उभारी देणारी नाहीत, नोटीसा धाडल्या जातात. त्यामुळे या गावातील नागरीकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर कायम स्वरूपात तोडगा काढावा, मी या भागाची खासदार म्हणून गोर गरीबांना वाऱ्यावर सोडणार नाही असेही मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. 

तसेच इंदापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नीरा उजवा कालवा तसेच खडकवासला कॅनॉल मधून पाझर तलाव भरावे अशी विनंती केल्यानंतर पुढील 8 दिवसांमध्ये पाणी सोडण्याचे आश्वासन अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग यांनी दिले असल्याने तालुक्यातील जनतेला आशेचा किरण दिसू लागला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांचे लाखेवाडी गावात अभिनंदन -
गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून येथील गरीब कुटुंबातील नागरीकांचा वन विभागाचे जागे संदर्भात समस्या होत्या. परंतु आजपर्यंत कोणत्याही नेत्याने सोडविल्या नाहीत. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने लाखेवाडी गावकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे अभिनंदन केले आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Airport Inauguration : नवी मुंबई विमानतळ उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदींकडून दि.बा.पाटील यांचा विशेष उल्लेख, म्हणाले...

Mhada House: मास्टर लिस्टवरील 'त्या' ७० विजेत्यांच्या घराचा हक्क रद्द होणार; म्हाडा एकतर्फी कारवाईच्या तयारीत, कारण...

Latest Marathi News Live Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा निर्णय! वर्षभरातील ३१ लाख १८ हजार रुपये वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दान

Railway Jobs 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! रेल्वेतील खेळाडूंना थेट जॉब, प्रक्रिया आणि पगार एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT